डॉक्टरांवर होणाऱ्या भ्याड हल्ल्यांचा निषेध परंतु रुग्णांची हेळसांड नको

गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिसांवर कारवाई तसेच 12 तासात गुन्हेगारांना अटक करण्याविषयी तरतुदी असाव्यात अशी सूचना

0
832

डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात आज BAMS/ BUMS डॉक्टरांच्या वतीने सर्व संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आज मा.मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची व वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.ना. गिरिष महाजन, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री मा. ना. रवींद्रजी चव्हाण, गृह राज्यमंत्री मा. ना. डॉ. रणजितजी पाटील आदी मान्यवरांची यांची भेट घेतली.

Doctors_against attacksया शिष्टमंडळात MCIM चे अध्यक्ष डॉ.आशुतोष गुप्ता, उपाध्यक्ष डॉ दत्ता पाटील, सदस्य डॉ विष्णू बावणे, डॉ.किरण पंडीत, निमा महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ.एल.जी.जाधव, BGA चे डॉ. मांगिरिश रांगणेकर, डॉ असित अरगडे, डॉ अभिजित आग्रे, डॉ. संजय लोंढे व डॉ.गायकवाड यांचा समावेश होता.

Doctors-against attacksडॉक्टरांवर होणाऱ्या हल्यांविषयी तीव्र निषेध व्यक्त करून शासनाला या विषयी कडक कारवाई करण्याची विनंती केली गेली. त्याविरोधातील कायद्यामध्ये गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिसांवर कारवाई तसेच 12 तासात गुन्हेगारांना अटक करण्याविषयी तरतुदी असाव्यात अशी सूचना करण्यात आली.

अशा कृत्यांचा निषेध व्यक्त करताना मूठभर समाजकंटकांच्या कृत्यामुळे संपूर्ण समाजाला वेठीस धरू नये असे मत सर्व प्रतिनिधींनी मांडले. तसेच त्याकरिता संपापेक्षा इतर मार्गांचा वापर केला पाहिजे असे स्पष्ट मत मांडण्यात आले.सदर विषयामध्ये शासनाने उचललेल्या पावलांविषयी सर्वांनी समाधान व्यक्त केले असून शासन डॉक्टरांची सुरक्षा विषयात गंभीर असल्याचे स्पष्ट झाले.